नवीन जुने म्हणतात गुलाल आमचाच..!
नाशिक (मनोज साठे) नाशिकमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचे बिगुल वाजले आहे. येत्या चौदा मार्चला महापौरांचा कार्यकाळ संपणार आहे तर स्थायी समितीची मुदत २८ फेब्रुवारीला संपली आहे. त्यामूळे महापालिकेचे कामकाज नियुक्त प्रशासक बघतील. कोविड काळामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. परंतु निवडणूक आयोग कडूं प्रभाग रचना झाल्यापासून सर्वंच इच्छूक उमेदवारानी यंदा गुलाल आपलाच या जोशात प्रचायंत्रणा राबवायला सूरवात केली आहे
ज्या जनसंपर्क कार्यालयात भाऊंचा फक्त कार्यकर्ताच दिसायचा तिथे आता भाउ, अण्णा, अप्पा, स्वतः तळ ठोकून बसू लागले आहेत आणि जनसेवा हाच आमचा प्रथम धर्म या प्रमाणे काम सुरू आहे. प्रभागातील कामांचे कूठे भूमिपूजन तर कूठे काम पूर्ण होण्याच्या आधीच उद्धघाटन उरकली जात आहे रस्ते चकाचक होत आहेत. प्रभागात कूठे आरोग्य शिबीर तर कूठे धार्मिक कार्यक्रम घेऊन जनतेत ओळख निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. लोक म्हणतात मागच्या चार वर्षात न झालेली कामे यांद होत आहे आणि शहरात हरवलेला विकास थोडा दिसत आहे.