तळोदा येथे विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा
तळोदा (दिपक गोसावी) तळोदा पोलिसांतर्फे विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये व तळोदा पोलीस निरीक्षक केलसिंग पावरा यांच्या सूचनेवरून आज विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कार्यवाही करण्यात आली.
तळोदा तालुक्यातील नागरिक होळीनिमित्त बाजारात खरेदी करण्यासाठी आले असता विना मास फिरताना काही नागरिक आढळून आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून मास घालण्याच्या सूचना व सोशल डिस्टंसिंग चे पालन करण्याचे नागरिकांना तळोदा पोलिसांकडून सूचित करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक बागुल, सहाय्यक पोलीस निरीक्षक केदार, पोलीस शिपाई युवराज चव्हाण, विलास पाटील, दिलीप वसावे, दिनेश वसावे, चंद्रसिंग वसावे, आदींनी शहरात विनामास फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली. व यापुढे हि विवाहास आलेल्या व त्या निमित्ताने गावात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कार्यवाही करण्यात येईल अशा सुचना देण्यात आल्या.