महाराष्ट्र
घराघरापर्यंत संघटनेचे कार्य पोहोचावे यासाठी बोदवड येथे दिनदर्शिकाचे वाटप
बोदवड (सतीश बाविस्कर) कोळी समाज संघटनांची शिखर संस्था कोळी महासंघ आमदार रमेशदादा पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष कोळी महासंघाचे कार्य घरा घरापर्यंत पोहोचावे यासाठी कोळी महासंघ यांनी केलेल्या कार्याबाबत एक दिनदर्शिका पुस्तिकेचे माध्यमातून खेड्यापाड्यात पोहोचावे यासाठी दिनदर्शिकेचे अनावरण करण्यात आले.
तसेच जिल्ह्यात तालुक्यात व ग्रामीण भागात बोदवड तालुका अध्यक्ष सुरेश कोळी यांच्यामार्फत समाजातील लोकांना व मित्र मंडळींना बोदवड येथील बस स्थानक कार्यालयात नुकतेच वाटप करण्यात आले आहे. त्यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. चालक-मालक संघटना पक्षाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते अनिल देवकर, सचिन उगले, रुपेश अग्रवाल, संपादक नंदलाल पठ्ठे, सतीश बाविस्कर, सुनील सपकाळ, जगदीश कोळी हे उपस्थित होते.