शिंदखेडा तालुका शिवसेनेतर्फे विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांचा सत्कार
दि.१० जुलै २०२२
शिंदखेडा : (प्रतिनिधि)- राज्याचे विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य नंदुरबार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार आमश्या दादा पाडवी यांचा सत्कार शिंदखेडा तालुका शिवसेनेच्यावतीने शासकीय विश्रामगृह गुलमोहर येथे करण्यात आला महाराष्ट्र राज्यात विधिमंडळ सदस्यांनमधून विधान परिषद सदस्यांची नुकतीच करण्यात आली शिवसेनेच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या माध्यमातून आदिवासी दुर्गम भागातील नंदुरबार जिल्हा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमश्या दादा पाडवी यांची निवड झाली आहे दिनांक आठ जुलै रोजी त्यांचा शपथविधी पार पडून धुळे जिल्ह्यात प्रथम त्यांचे आगमन झाल्याने शिवसेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी संपर्कप्रमुख बबनराव थोरात
सहसंपर्कप्रमुख महेश भाऊ मिस्त्री जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे माजी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे विधानसभा संघटक गणेश परदेशी जिल्हा संघटक मंगेश पवार शिवसेना शिंदखेडा तालुका प्रमुख ईश्वर पाटील युवा सेना जिल्हाप्रमुख आकाश कोळी दोंडाईचा येथील शैलेश सोनार राका शेठ भाईदास पाटील तालुकाप्रमुख गिरीश पाटील तालुका समन्वयक विनायक पवार शहर प्रमुख संतोष देसले बेटावद येथील गणेश सोनार माझी कृउबास संचालक सर्जेराव पाटील माजी जि प सदस्य साहेबराव पाटील गोलू राजपूत मुकेश राजपूत विशाल बडगुजर आदि सह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते याप्रसंगी आमदार आमश्या दादा पाडवी म्हणाले धुळे जिल्ह्यात शिवसेना पुन्हा नव्याने उभी करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करू शिवसैनिकांनी आतापासूनच विधानसभेच्या दृष्टीकोनातून तयारी करा माझ्यासारख्या आदिवासी भागातून आलेल्या सर्वसामान्य शिवसैनिकांना शिवसेनेने आमदार केले यापेक्षा आणखी काय हवे शिवसेना सर्वसामान्य जनतेच्या पक्ष आहे हे पक्षप्रमुखांनी दाखवून दिले असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले धुळे नंदुरबार जिल्ह्याचा मी पालक आमदार झालो असून शिवसैनिकांच्या कोणत्याही कामासाठी मी सदैव तयार आहे असे आवाहन त्यांनी केले.