जिल्हा परीषद प्राथमिक शाळा रामजीनगर येथे शालेय व्यवस्थापन समितीची निवड संपन्न
सोयगाव (विवेक महाजन) जिल्हा परीषद प्राथमिक शाळा रामजीनगर येथे माजी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुनिता जोहरे यांच्या अध्यक्षतेखाली पालक सभेचे आयोजन करून या सभेत नविन शालेय व्यवस्थापन समितीची निवड बिनविरोध करण्यात आली.
यावेळी अध्यक्ष म्हणून एकनाथ इंगळे, उपाध्यक्ष मनिषा जेठेे, शबिना बी शेख सलीम, दिपाली सरोदे, यांची तर सदस्य राजू माळी, सुनिता जोहरे यांची निवड करण्यात आली तर शिक्षण तज्ञ म्हणून शिक्षण प्रेमी, समाजसेवक योगेश बोखारे यांची व इतर सदस्यिंची निवड खेळीमेळीच्या वातावरणात करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून सोयगांव नगरपंचायतचे नगराध्यक्षा आशाबी तडवी,व नगरसेवक गजानन कुडके हे उपस्थित होते. यावेळी पालक योगेश कळवत्रे, सलीम पटोकर, सिकंदर शेख, आप्पा कुर्लेकर, दत्तू जोहरे, शंकर जेठे, अजय सरोदे, गोविंद इंगळे, आशाबाई पुंड, विलास इंगळे, रामदास तेंलगे, पालक सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर सभा यशस्वी पारपाडण्यासाठी मुख्याध्यापक किरण पाटील, आसिफ देशमुख यांनी प्रयत्न केले तर मान्यवरांचे आभार सहशिक्षक प्रभाकर बि-हारे यांनी मानले. सर्व निवड झालेल्यांचे मान्यवरांनी अभिनंदन केले.