शिंदखेडा येथील वसतिगृहासमोर विद्यार्थी पालकांसह आमरण उपोषणाचा तिसर्या दिवशी पी.आय.यांच्या उपस्थितीत उपोषण सोडले !
शिंदखेडा (यादवराव सावंत) धुळे जिल्ह्य़ातील शिंदखेडा येथील संत गुलाब महाराज आदिवासी मुलांच्या वसतिगृहासमोर वालखेडा येथील अविनाश दिलीप कोळी व हितेश दिलीप कोळी या दोन्हीही विद्यार्थीचे गेल्या दोन वर्षापासून प्रवेश रद्द करण्यात आला आहे. संबधीत प्रकल्प अधिकारी धुळे यांनी संविधानीक आधार न घेता द्वेष भावनेने प्रकिया केली आहे. म्हणुन दि.15 मार्च पासून वसतिगृहासमोर विदयार्थी व पालक आई सरलाबाई दिलीप कोळी हे आमरण उपोषणास बसले होते. आज तिसर्या दिवशी रात्री उशिरा नऊ वाजेच्या दरम्यान उपोषण सोडण्यात आले.
यावेळी शिंदखेडा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुनील भाबड तसेच अधिक्षक के.के.अवय्या यांनी धुळे येथील प्रकल्प अधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्या शी फोन द्वारे संपर्क साधून तुर्त तोंडी आश्वासन देऊन प्रवेश दिला जाईल तसेच मागण्या मान्य केल्या.त्या संधर्भाचे लेखी पत्र सोमवारी देणार असल्याचे सांगितले.म्हणुन तुर्तास उपोषण मागे घेण्यात आले आहे. तसेच पी.आय.सुनील भाबड व वसतिगृह अधिक्षक के.के.अवय्या आणि अॅड.अरविद मंगासे हयांच्या हस्ते सरबत देवुन उपोषण सोडले. आज शिंदखेडा येथील पोलीस स्टेशन मार्फत पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांनी प्रकल्प अधिकारी व अधिक्षक वसतिगृह शिंदखेडा यांना पत्र पाठवून संबंधीत आमरण उपोषणाला बसण्याची जागा उघडयावर आहे.त सेच उपोषण करामध्ये एक महिला व अल्पवयीन मुलांचा समावेश आहे रात्री अपरात्री अनुचित घटना घडू शकतात. म्हणुन उपोषणास बसलेल्याची समजूत काढून आपल्या स्तरावर मार्ग काढावा असे म्हटले होते.
दुसर्या दिवशी दुपारी शिंदखेडा तहसीलदार सुनील सैदाणे सह मंडळाधिकारी आर.एच कोळी यांनी उपोषण स्थळी भेट दिल्यावर उपोषणास बसलेल्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत उपोषण मागे घेण्यात यावे असे सांगितले.मात्र जोपर्यंत विदयार्थी ना वसतिगृहात प्रवेश मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाहीत.यावर ठाम होते. तीन दिवसात चाललेल्या उपोषण कर्ते यांनी पी.आय.सुनील भाबड व पाठिंबा दर्शविणारे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष मिलिंद पाटोळे व वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष नामदेव येळवे यासह अॅड.अरविंद मंगासे तसेच वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे तसेच स्पीड न्युज महाराष्ट्रचे शिंदखेडा तालुका प्रतिनिधी यादवराव सावंत यांचे आनंद अश्रृनी आभार मानले.