महाराष्ट्र
संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात डॉ. गणेश मिसाळ यांचे व्याख्यान
सोयगाव (प्रतिनिधी) येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात सायन्स फोरम अंतर्गत सी व्ही रमण व्याख्यानमालेत डॉ.गणेश मिसाळ यांनी ‘गांडूळ खत’ प्रकल्प निर्मिती या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. रावसाहेब बारोटे उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.शिरीष पवार व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. लक्ष्मीनारायण कुरपटवार यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. गणेश गायकवाड यांनी केले.




