सिल्लोड शहर प्रभाग क्र.१२ पोटनिवडणुक ; शिवसेनेची प्रचारात आघाडी
उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी घेतल्या कॉर्नर सभा ; शिवसेनेच्या उमेदवाराला प्रचंड मतांनी विजयी करण्याचे केले अवाहन
सिल्लोड (प्रतिनिधी) सिल्लोड शहरातील प्रभाग क्र. १२ (अ) च्या पोटनिवडणुकीतील शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार पठाण फातमाबी जब्बारखान यांच्या प्रचारार्थ युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी विविध ठिकाणी कॉर्नर सभा घेतल्या. या कॉर्नर सभांना मतदारांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. यावेळी अब्दुल समीर यांनी शिवसेनेच्या उमेदवार पठाण फातमाबी जब्बारखान यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
अब्दुल समीर यांनी प्रभाग क्र.१२ मधील होळी गल्ली, गणेश कॉलनी, बालाजी गल्ली, तेली गल्ली आदी भागात कॉर्नर सभा घेतल्या. त्यासोबतच शिवसेना व युवासेना व शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शहरात पदयात्रा काढून शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले. एकूणच प्रभाग क्र. १२ अ च्या निवडणुकीत शिवसेनेने प्रचारात जोरदार आघाडी घेतल्याचे चित्र आहे.
यावेळी नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम, डॉ. मॅचिंद्र पाखरे, कृउबा समितीचे उपसभापती तथा न.प.तील शिवसेनेचे गटनेते नंदकिशोर सहारे, शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख दीपाली भवर, जिल्हा निजोजन समितीचे सदस्य सुदर्शन अग्रवाल, नगरसेवक शकुंतलाबाई बन्सोड, रईस पठाण, विठ्ठल सपकाळ, जुम्मा खा पठाण, शेख मोहसीन, आरेफ पठाण, सोसायटीचे चेअरमन राजेंद्र बन्सोड, युवासेना शहरप्रमुख शिवा टोम्पे, संजय मुटकुटे, फहिम पठाण, संतोष धाडगे, दीपक वाघ, ज्ञानेश्वर कुदळ, अमृतलाल पटेल, कैलास इंगे, पांडुरंग डवणे, जगन्नाथ कुदळ, शेख आबेद, शेख आशक, देवराव भाग्यवंत, नासेर पठाण, गफ्फार सौदागर, रामप्रसाद तसेवाल, शेख हबीब आदींची उपस्थिती होती.