गुन्हेगारीमहाराष्ट्र
वैजापूर तालुक्यात चोरीचे प्रमाण वाढले !
वैजापूर (प्रतिनिधी) तालुक्यामधील चोरीचे प्रमाण फार प्रमाणात वाढले आहे. विशेष करून गोळवाडी मध्ये चोर्या होत असून शेतकऱ्यांचे बैल जोड, गाई अशा अनेक चोऱ्या झाल्या आहेत.
काल रात्री चक्क चोरांनी मोटर सायकल चोरण्याचा प्रयत्न केला ती मोटर सायकल चालू होत नसल्यामुळे त्यांनी घराजवळून पन्नास फुटाच्या अंतरावर नेऊन तिच्या दोन्ही चाक काढून नेले आहे. त्यामुळे गोळवाडी मध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. वारंवार चौऱ्या होऊनही वैजापूर प्रशासन शांत बसलेले आहे. विशेष म्हणजे चोरांचा धुमाकूळ चालू असताना रात्री गावंडे डीपीचे केबलच काढून नेले.