महाराष्ट्र
धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नवाब मलिक यांच्या अटकेचा जाहीर निषेध : रणजीत राजे भोसले
धुळे (प्रतिनिधी) धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नवाब मलिक यांच्या अटकेच्या संदर्भात निषेध व्यक्त करण्यात आला आहे. धुळे शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले यांनी सदर घटनेचा निषेध करुन म्हटले आहे की, भाजप सरकार सरकारी यंत्रणाचा गैरवापर करीत आहे. ईडीचा धाक दाखवून मंत्र्यांना व महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्रास देण्याच काम चालू आहे. हे लोकशाहीला घातक आहे. यामुळे चूकीचा पायंडा पडू शकतो त्यामुळे सदर घटनेचा निषेध रणजीत राजे भोसले यांनी केला असून यापुढे ईडीचा धाक खपवून घेतला जाणार नाही.