राष्ट्रसंत मिशन गुरुकुलचा भव्य शुभारंभ
देगलूर (प्रतिनिधी) आज नांंदेड येथे समाज भुषण रामदास पाटील सुमठाणकर यांच्या नेतृत्वाखाली समाजातील होतकरू गरिब विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क असे राष्ट्रसंत मिशन गुरुकुल सेवेचा भव्य शुभारंभ आज करण्यात आला. राष्ट्रसंत मिशन गुरुकुल चे उद्घाटन राजमुद्रा अकॅडमी चे प्रा.मनोहर भोळे सर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी रामदास पाटील सुमठाणकर यांनी राष्ट्रसंत मिशन गुरुकुल चे प्रास्ताविक व रुपरेषा मांडण्यात आली.समाजातील होतकरू व गरिब विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क अशी सेवा देण्यासाठी व तसेच आपल्या समाजातील जास्तीत जास्त प्रशासकीय अधिकारी कसे होतील यासाठी आपण कटिबद्ध आहोत असे सांगितले. विद्यार्थी साठी काही अडी-अडचणी असतील तर त्या मी पुर्ण पणे सोडविण्याचा प्रयत्न करील असे सांगितले तसेच यापुढे भविष्यात राष्ट्रसंत मिशन मार्फत समाजातील गोरगरीब जनतेसाठी दवाखाना सुरू करण्याचा प्रयत्न असेल व समाजातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी नवीन नवीन उद्योग सुरू करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केले जाईल असे सांगितले व तसेच प्रा.मनोहर भोळे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले मी सुद्धा आपल्या राष्ट्रसंत मिशन गुरुकुल साठी सेवा देण्याचा प्रयत्न करील असे सांगण्यात आले.