डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालय धुळे येथे अभिरूप न्यायालय स्पर्धेचे आयोजन
धुळे (प्रतिनिधी) बुद्धवासी ॲड रावसाहेब अशोक निळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विद्यापीठ स्तरीय अभिरूप न्यायालय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा विद्यार्थी कल्याण विभाग कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली.
या स्पर्धेचे उद्घाटन माननीय न्यायाधीश वैभव कुलकर्णी मुख्य न्यायाधीश दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर धुळे यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय दादासाहेब महेंद्रजी निळे अध्यक्ष वेस्ट खानदेश दलित शिक्षण प्रसारक मंडळ उपस्थित होते. आपल्या भाषणामध्ये न्यायाधीश वैभव कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना अभिरूप न्यायालयाचे काय महत्त्व आहे याबद्दल माहिती दिली. अभिरूप न्यायालय स्पर्धेमध्ये भाग घेतल्यामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्यामध्ये वाढ होते व त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धेत भाग घेणे गरजेचे आहे. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना वकिली व्यवसायाचा अनुभव येण्यास मदत होते असे मत त्यांनी व्यक्त केले.