महाराष्ट्रराजकीय

शिवसेनेतर्फे सरसेनापती हृदयसम्राट बाळासाहेबांना अभिवादन

चोपडा (विश्वास वाडे) हिंदू हृदयसम्राट सरसेनापती स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी १०.३० वा. चोपडा येथील शिवाजी चौकात अभिवादन करण्यात आले.

चोपड्याचे तालुका प्रमुख राजेंद्र पाटील यांच्या हस्ते सरसेनापती बाळासाहेबाच्या छायाचित्राचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळाला तालुका प्रमुख राजेंद्र पाटील यांनी माल्यार्पण केले. त्यानंतर चोपडा उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त फळवाटप करण्यात आले. तसेच वेले येथे अनाथाश्रमात व वृद्धाश्रमात मुलांना व वृद्धांना अन्नदान करण्यात आले.

यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख विकास पाटील, तालुका प्रमुख राजेंद्र पाटील, शहर प्रमुख आबा देशमुख, नरेश महाजन, तालुका संघटक सुकलाल कोळी, नगरसेवक महेंद्र धनगर, राजाराम पाटील, प्रकाश राजपूत, लासुरचे गंभीर, नरेंद्र बाविस्कर, सुनिल बरडीया, बबलू पालीवाल, किरण करंदीकर, महेश गायकवाड, विजय नेतकर, गोरगावले अरुण कोळी, चुंचाळे संजू बाबायुवा उपजिल्हा प्रमुख दीपक चौधरी, युवासेना शहर प्रमुख डॉ.रोहन पाटील, नंदू गवळी, मंगेश पाटील, दिव्यांक सावंत, कमलेश बडगुजर, गोलू मराठे यासह शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे