महाराष्ट्र
श्री साईबाबा सस्थांन व साईबाबा ऊत्सव समितीच्या वतीने समाजसेवक राजू परदेशी यांचा सत्कार
बोदवड (सतिष बाविस्कर) दर गुरुवारी दुपारी १२ वाजता महाआरती व महाप्रसाद श्री साई बाबा मंदिर येवती जामठी बोदवड रोडवर पंचक्रोशित ग्रामस्थ यांच्या सहकार्याने साईबाबांची आरती व महाप्रसादाचे आयोजन केले जाते. काल समाज सेवक राजुभाऊ शिवलाल परदेशी (रा.लोणवाडी) यांनी साईबाबा चरणी सेवा अर्पण केली.

यावेळी प्रमुख पाहुणे जिल्हा बँकेचे संचालक रोहिणीताई खडसे (खेवलकर) व कार्यक्रमाला बोदवड तालुका बरेच मान्यवर मंडळी उपस्थित होते. तसेच श्री साईबाबा सस्थांन व साईबाबा ऊत्सव समितीच्या वतीने समाज सेवक राजुभाऊ शिवलाल परदेशी यांचा साईबाबा प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.



