तुकडा प्लॉट खरेदी, विक्री लवकर सुरू करण्यात यावी !
तळोदा (दिपक गोसावी) गेल्या २०२१ नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यापासून तळोदा शहरासह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात तुकडा प्लांट खरेदी विक्री बंदी केलेली आहे. त्यामुळे शासनाच्या लाखो रुपयांचा महसुल बुडत असुन याबाबतीत अनेक महिन्यांपासून शासन दरबारी कागदपत्रे रंगविली जात आहेत यासंबंधी लोक प्रतिनिधी यांनी अधिकाऱ्यांची भेट घेतली परंतु आजपर्यंत याकामी तोडगा निघालेला नाही. सदर तुकडा बंदी प्लांट कामी शहादा, तळोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी व तळोदा शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या मार्गदर्शनाने शेकडो प्लांट धारक नंदुरबार येथे जाऊन जिल्हाचे अप्पर जिल्हाधिकारी महेश पाटील यांच्या दालनात शहरातील प्लॉट विभागणी/खातेफोड संदर्भात चर्चा, विचार विनिमय करण्यात आला.
यावेळी नंदुरबार जिल्हा नगर रचनाकार हे सुद्धा तेथे उपस्थित होते. तुकडा बंदी प्लॉट खरेदी विक्री करण्याची कोणतीही बंदी वरिष्ठ पातळीवरून केली नसुन फक्त हायवेवर बांधकाम करण्यासाठी ३० फूट अंतर सोडून बांधकाम करावे व शासन नियमांचे काटेकोर पालन करण्याचे सांगितले गेले होते. घरांसाठी तुकडे पॉट खरेदी विक्रीची कुठलीही बंदी अथवा शासन आदेश वरिष्ठ पातळीवरून आलेला नाही. असे असतांना सदर कामाचे भिजत घोंगडे कुठे अडकले आह याबाबत संबंधित तळोदा खरेदी ,विक्री अधिकाऱ्यांशी चर्चा करून घेण्याचे सांगण्यात आले. परंतु याबाबतीत सदर अधिकारी यांनी सांगितले आहे की सदर फाईलवर मा. जिल्हाधिकारी यांच्या सह्या झाल्यावर सदर तुकडा बंदी प्लांट खरेदी विक्री सुरू करण्यात येईल. परंतु आज चार महिने लोटुनही तुकडा प्लांट खरेदी विक्री होत नाही आहे. यामुळे गोरगरीब जनतेला तुकडा प्लांट खरेदी करता येत नसल्याने पालीकेचे ही पंतप्रधान योजनेचे घरकुला चेही काम रखडले जात आहे. तरी अधिकाऱ्यांनी याबाबत लक्ष घालून प्लॉट खरेदी, विक्री पुन्हा सुरू करावी अशी मागणी सामान्य जनतेकडून व्यक्त करण्यात येत आहे.