ब्रेकिंग

अप्पासाहेब धर्माधिकारी यांना गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते दिला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार

मुंबईमहाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 सोहळा ( Maharashtra Bhushan Award 2022 ) यंदा नवी मुंबईच्या सेंट्रल पार्क या ठिकाणी पार पडणार आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. रविवारी 16 एप्रिल रोजी महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 सोहळा पार पडणार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah ) यांच्या हस्ते अप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadikari ) यांना हा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जाणार आहे. नवी मुंबई मधील खारघर येथील कॉर्पोरेट पार्क मैदानात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. या बैठकीस रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार भरत गोगावले, प्रशांत ठाकूर, महेश बालदी तसेच अनेक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे नियोजन काळजीपूर्वक करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. कोकण परिक्षेत्रातील प्रत्येक महापालिकेने उपयुक्त दर्जाचा अधिकारी प्रत्येक गोष्टीचा समन्वय राखण्यासाठी नेमावा. तसेच सर्व घटकांनी जबाबदारीच भान ठेऊन दिलेली जबाबदारी पार पाडावी. कार्यक्रमाला लाखो नागरिक येणार असल्याने काळजीपूर्वक नियोजन करण्याचे निर्देश ही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

कायदा व सुव्यवस्था तसेच पार्किंगची ही योग्य व्यवस्था करावी करुन ट्रॅफिकबाबत ही योग्य व्यवस्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय पथक यांची पूर्ण तयारी ठेवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाा 10 लाखांहून अधिक अनुयायी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने रविवारी रेल्वेवर मेगाब्लॉक करू नये अशी विविध पक्षांची मागणी आहे. नवी मुंबईतील खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानात हा कार्यक्रम पार पडणार असल्याने मुख्यमंत्री याबाबत स्वत: लक्ष घालत आहेत.

महाराष्ट्र भूषण सोहळ्यासाठी महामार्गांवर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या तीनही महामार्गांवर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. १४ एप्रिलला रात्री १२ ते १६ एप्रिल रात्री १२ वाजेपर्यंत ही बंदी लागू राहणार आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे