महाराष्ट्र
मालपुर गावात दुर्गा माता यात्रा उत्सव संपन्न
मालपुर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे दरवर्षी सालाबादप्रमाणे यात्रा उत्सव व जाऊळचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
यावर्षी ६० बोकड मारले गेले. दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट असल्यामुळे जत्रा भरत भरत नव्हती. यंदा मात्र जत्रा भरली होती व मंदिर परिसरात अत्यंत प्रचंड गर्दी झाली होती. मंदिर परिसरात कार्यक्रम यशस्वी व्हावं म्हणून व समस्त चव्हाण परिवार यांनी परिश्रम केले. उपसरपंच संतोष भावराव चव्हाण यांनी ही माहिती दिली .



