दिनांक:- १५ आँगस्ट २०२२ वै
जापुर:प्रतिनिधि- गहनीनाथ वाघ
वैजापुर तालुक्यातील पुरणगाव आरोग्यवर्धिनी उपकेंद्रात प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये दि.१४ आँगस्ट रोजी “आजादी का अमृत महोत्सव” निमित्ताने एनसीडी कॅम्प आयोजित करण्यात आले होते. डॉक्टर वृषाली हजारी यांच्या मार्गदर्शनाखाली तीस वर्षावरील पुरण गावातील नागरिकांचा असंसर्गजन्य मधुमेह कर्करोग रक्तदाब अशा आजारांच्या तपासण्या करण्यात आल्या तपासणी करण्यासाठी गावातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला सामुदायिक आरोग्य अधिकारी आदित्य ज्ञानेश्वर गजेवार यांनी नागरिकांच्या तपासण्या केल्यात नागरिक निवृत्ती ठोंबरे कचरू लहिरे सतीश कटारे ताराबाई ठोंबरे लता कटारे संध्या नवले सुनंदा लाहिरे नानासाहेब पवार रामभाऊ लोखंडे यांच्यासह गावातील गरोदर माता संशयीत कुष्ठरोग क्षयरोग रुग्णांची तपासणी करण्यात आली यावेळेस आशा स्वयंसेविका आम्रपाली कजबे ज्योती विश्वासराव इत्यादी उपस्थित होते