महाराष्ट्र

शिंदखेडा तालुक्यात 20 गावांतील 810 हेक्टर रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान

शिंदखेडा (यादवराव सावंत) तालुका प्रतिनिधी तालुक्यातील मागील आठवडय़ात वीस गावाच्या गावशिवारात गारपीट, वादळ व अवकाळी पावसामुळे 33 टक्के पेक्षा जास्त क्षेत्रात शेतकरीवर्गाचे रब्बी हंगामातील सुमारे 910 हेक्टरवरील रब्बी दादर, ज्वारी, हरभरा. मका , गहू असे एकूण एक हजार 364 शेतकरीवर्गाचे नुकसानीचे पंचनामे कृषी व महसूल विभागाकडून करण्यात आला असून येवढे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.

तालुक्यात विविध भागात गारपीट, वादळासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरीचे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. काढणीला आलेला दादर, ज्वारी, हरभरा, मका पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. गेल्या वर्षीही तालुक्यात 91 गावात जानेवारी फेब्रुवारी महिन्यात गारपीट व वादळासह अवकाळी पाऊस झाला होता. काही गावातील शेतकरी यांना शासनाची मदत मिळाली नाही. म्हणुन शेतकरी मध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. ७ मार्च ला संध्याकाळी तालुक्यात बरड भागासह वीस गावाला गारपीट व वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने झोडपून काढले होते. रब्बी हंगामातील 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान क्षेत्र झालेले आहेत. त्यात ज्वारी, दादरचे 130 हेक्टरवरील 240 शेतकरीवर्गाचे, हरभरा 100 हेक्टरवरील 192 शेतकरीवर्गाचे, गहु पिकांचे 480 हेक्टरवरील 715 तर मक्याचे 100 हेक्टरवरील 295 शेतकरी यांचे 33 टक्के बाधित क्षेत्राचे नुकसान झाले आहे. कृषी, महसूल विभागाने पंचनामे करण्याचे काम केले आहे. तरी शासनाने बाधित शेतकरी वर्गाला मदत त्वरित जाहीर करण्यात यावी अशी मागणी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे