शिंदखेडा तालुक्यातील नेवाडे विविध कार्यकारी सोसायटीवर राष्ट्रवादीच्या माजी आमदार रामकृष्ण पाटीलांचाच झेंडा
भावी आमदार हेमंत साळुंखे यांच्या पॅनलचा धूव्वा
शिंदखेडा (यादवराव सावंत) शिंदखेडा- तालुक्यातील नेवाडे येथील विविध कार्यकारी सोसायटी च्या काल झालेल्या निवडणुकीत विरोधी पॅनलचा धुव्वा उडवत माजी आमदार रामकृष्ण पाटील यांच्या परिवर्तन पॅनल ने 12 पैकी 12 जागा जिंकून सोसायटीवर आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले. याआधीही या सोसायटीवर पाटील यांचे वर्चस्व होते. त्यामुळे या सोसायटीवर आता पुन्हा पुढील पाच वर्षासाठी राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे.
नेवाडे विविध कार्यकारी सोसायटी ची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. 12 जागांसाठी ही निवडणूक होती. निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे रामकृष्ण पाटील यांच्या परिवर्तन पॅनल तर्फे सर्व 12 जागांवर उमेदवार रिंगणात होते. तर त्यांच्या विरोधात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे यांच्या पॅनल तर्फे नऊ उमेदवार रिंगणात होते. रामकृष्ण पाटील हे शिवसेनेचे माजी आमदार आहेत, तर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष
हेमंत साळुंखे यांना त्यांचे समर्थक भावी आमदार संबोधतात. त्यामुळे माजी आमदार विरुद्ध भावी आमदार असा हा सामना होता. दोघा दिग्गजांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागलेली होती. दोघांचे हे होम ग्राउंड होते. त्यामुळे निवडणूक अत्यंत चुरशीची होती. या लढतीकडे तालुक्याचेच नाही तर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले होते. या लढतीत माजी आमदार रामकृष्ण पाटील यांनी विरोधी पॅनल ला धोबीपछाड करून बाजी मारली. या निकालामुळे आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या शिवसेनेच्या जिल्हाध्यक्ष हेमंत साळुंखे यांना हा मोठा धक्का समजला जात आहे. राज्यात शिवसेनेची सत्ता असताना आपल्या होम ग्राउंड वर साळुंखे यांना सोसायटीची एकही जागा निवडून आणता येऊ शकली नाही हया याबाबत चर्चा सुरू आहे.
काल नेवाडे गावात याबाबत मतदान झाले आणि लगेच मतमोजणी झाली मतमोजणीच्या ठिकाणी दोघं पॅनलच्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी त्यानंतर एकच जल्लोष केला. रामकृष्ण पाटील यांचेसह अरविंद जाधव, ज्ञानेश्वर पवार, डॉ. आर. आर.पाटील, आर बी पाटील, नारायण पवार, चंद्रशेखर पवार, अशोक पवार,रमेश पवार, राजेंद्र साळुंखे, साहेबराव पवार, पंडित पवार, किशोर पवार, दिलीप पवार, मोतीलाल जाधव, राहुल ठाकरे, गोकुळ भवर, गुलाब पिंजारी, आसाराम नगराळे, मुनीर पिंजारी, भाईदास बागले ,जयवंत साळुंखे, यशवंत साळुंखे , मधुकर साळुंखे, शांतीलाल साळुंखे, किसन साळुंखे , भिकन साळुंखे, संतोष पवार ,किसन भवरे, आदी मान्यवरांनी विजयी उमेदवारांचे स्वागत आणि सत्कार केला. याबाबत झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन चंद्रशेखर पाटील यांनी केले.
निवडणुकीतील विजयी उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते अशी सर्वसाधारण
धनंजय मगन पाटील 147
शिवाजी रामदास पाटील 139
शांतीलाल हरिश्चंद्र जाधव 136
ज्ञानेश्वर दौलत पाटील 136
भाईदास वेडु पाटील 133
मोहन रामचंद्र जाधव 128
लहू पूंडलिक पाटील 126
सुरेश भिला पाटील 123
अनुसूचित जमाती मधून
रामदास लकडू खैरनार 129
महिलांमधून निंबाबाई नारायण पाटील 136
लताबाई अशोक पाटील 121
आणि ओबीसी प्रवर्गामध़ून
विकास तुकाराम पाटील 139
कोण काम करणारे आहेत आणि कोण नाहीत हे नेवाडेकर नागरिक चांगले ओळखून आहेत. नागरिकांनी टाकलेला विश्वास पूर्णपणे सार्थ ठरवू. विविध कार्यकारी सोसायटी च्या माध्यमातून सभासदांचे कामे करू, त्यांना मदत करू.
-माजी आमदार रामकृष्ण पाटील