राजकीय

हिंगोली जिल्हा काँग्रेस पक्ष निरीक्षकपदी आमदार अमर राजुरकर यांची निवड

हिंगोली (मारोती हनेगावे) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशावरून हिंगोली जिल्ह्याच्या संघटनात्मक आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तसेच विधान परिषद प्रतोद आमदार अमर राजूरकर त्यांच्या कार्याची दखल घेऊन, संघटनात्मक बांधणीतील त्यांचे अनुभव लक्षात घेता देगलूर, बिलोली पोटनिवडणुकीतील विजयश्री ज्या पद्धतीने त्यांनी राखून ठेवत काँग्रेस पक्षाला मजबूत करण्याचे कार्य आमदार अमर यांनी, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात आमदार अमर यांनी काम पाहिले. त्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षांनी आमदार अमर राजूरकरची हिंगोली जिल्हा काँग्रेस पक्षनिरीक्षकपदी निवड करण्यात आली. त्यामुळे निश्चितच हिंगोली जिल्ह्यात जिल्हा पातळीवरील व तालुका पातळीवरील पदाधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. निश्चितपणे अमर भाऊ राजूरकर हिंगोली जिल्ह्यांमध्ये पक्षवाढीसाठी त्यांचे योगदान निश्चितच राहील अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये बोलली जात आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे