महाराष्ट्र
भगवान परशुराम सेवा संघाच्या वतीने राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा सत्कार
सिल्लोड : सिल्लोड येथे मुख्यरस्त्यावरील चौकास भगवान परशुराम यांचे नाव देण्यास पुढाकार घेतल्या बद्दल भगवान परशुराम सेवा संघ औरंगाबाद व जन्मोत्सव समिती औरंगाबादच्या वतीने महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा भव्य सत्कार करण्यात आला. औरंगाबाद येथील तापडिया नाट्य मंदिरात हा सत्कार सोहळा पार पडला.
यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, शिवसेना वैदयकीय आघाडीचे डॉ. मच्छिंद्र पाखरे, रवींद्र दाणी, सुरेंद्र कुलकर्णी, अनिल मुळे, विश्वजित देशपांडे, केदार पाटील, साकेत खोचे, वसंत किनगावकर ,डॉ. राहूल कुलकर्णी, सचिन उपळीकर, प्रणव दाणी, प्रकाश अनवीकर, रवीद्र कुलकर्णी, आदित्य कुलकर्णी, मंगेश खोंडे, अमोल नाईक, रूपेश कुलकर्णी, विजय नाईक,कैलास इंगे, राजू महाजन, गिरीश कुलकर्णी, अजय नाईक, बापूराव नाईक आदींची उपस्थिती होती.