महाराष्ट्रराजकीय

मनसेचा १६ वा वर्धापन दिन धुळे ग्रामीणमध्ये विविध उपक्रमांनी संपन्न

धुळे (गणेश कासार) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १६ व्या वर्धापन सन्माननीय राज ठाकरे यांच्या आदेशान्वये, पक्ष निरीक्षक विनयजी भोईटे यांच्या सूचनेनुसार, मनसे धुळे जिल्हा अध्यक्ष ॲड. दुष्यंतराजे देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार मनसे धुळे तालुक्या च्या वतीने ग्रामीण भागात विविध उपक्रमांद्वारे वर्धापन दिन साजरा करण्यात आला. मनसे धुळे जिल्हा अध्यक्ष ॲड. दुष्यंतराजे देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळे तालुक्यातील तिखी डेडरगाव तसेच वार कुंडाणे व हेंद्रून या गावातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप तसेच वह्यांचे वाटप मोठ्या प्रमाणात करण्यात आले.

तसेच महिला दिनाचे औचित्य साधत येथील महिला शिक्षकांना फेटे बांधत त्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार देखील मनसेच्या वतीने करण्यात आला. या सर्व कार्यक्रमांचे आयोजन मनसे धुळे तालुका अध्यक्ष संतोष मिस्तरी यांनी केले होते. या कार्यक्रमांना प्रमुख उपस्थिती मनसे धुळे जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. दुष्यंतराजे देशमुख, जिल्हा सचिव संदीप जडे, अजितसिंह राजपूत, तालुका उपाध्यक्ष शांताराम नवसारे, दादा पाटील तालुका सचिव तुषार पोद्दार, विजय मिस्तरी व इतर पदाधिकारी व तालुक्यातील विविध कार्यकर्ते मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे