खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते श्रम कार्ड उज्वला गॅस योजनाचे वाटप
मुक्ताईनगर (सचिन झनके) ग्रामीण (शैलेश गुरचळ) फैजपूर (यावल) येथे “शिव जयंती” निमित्त भाजपा फैजपूर शहर यांच्या वतीने खासदार रक्षा खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत “ओबीसी मोर्चा शाखा गठन, आयुष्यमान भारत व ई श्रम कार्ड वाटप, उज्वला योजना गॅस वाटप” अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमास भेट देऊन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच केंद्राच्या विविध योजना अंतर्गत आयुष्यमान भारत, ई श्रम कार्ड व उज्वला योजना गॅसचे लाभार्थ्यांना वाटप करून, ओबीसी मोर्चा पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली.
यावेळी माझ्यासह भाजपा ओबीसी मोर्चा सचिव भरतभाऊ महाजन, फैजपूर नगराध्यक्ष सौ.महानंदा होले, महिला आघाडी शहरध्यक्ष जयश्री चौधरी, माजी नगराध्यक्ष भास्कर चौधरी, पांडुरंग सराफ, भाजपा शहराध्यक्ष अनंता नेहेते, प्रमोद चौधरी, निलेश राणे, जिल्हा सरपंच परिषद अध्यक्ष पुरोजित चौधरी, मधुकर कारखाना संचालक नरेंद्र नारखेडे, अनुराधा परदेशी, खरेदी विक्री संघ संचालक नितीन नेमाडे, वसंतदादा परदेशी, संजय सराफ, राजेंद्र चौधरी, रविंद्र होले, कडूसिंग परदेशी, वैभव वकारे, इण्डेन गॅस वितरक प्रदिप पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.