मुक्ताईनगर तालुक्यामध्ये एमआयएम पक्ष बांधणी मजबूत
मुक्ताईनगर (सचिन झनके), ग्रामीण (शैलेश गुरचळ) मुक्ताईनगर येथे एमआयएम पार्टीचे कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. जळगाव जिल्ह्याचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाने जळगाव जिल्हाध्यक्ष अहमद सर यांनी मुक्ताईनगर मधील सर्व कार्यकर्त्यांचा अतिशय आनंदाने मार्गदर्शन करण्यात आले व त्याच बरोबर मुक्ताईनगर तालुक्याच्या अंतर्गत चिखली या गावातील इतर कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश करून घेतला आणि पक्ष मजबूत तिला बळकटी दिली.
उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष यांच्या वतीने AIMIM पक्षाची पार्श्वभूमीबाबत व्यक्त केले. कार्यकर्त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे साम-दाम-दंड-भेद सर्व पद्धतीने मदत करण्याचे जाहीर आश्वासन दिले. मुक्ताईनगरची राजकीय परिस्थिती लक्षात घेता येणाऱ्या मुक्ताईनगर आगामी नगरपंचायतीच्या निवडणुक लक्षात घेता मोठ्या संख्येने AIMIM पार्टीचे उमेदवार पाठवा असे आव्हान सुद्धा त्यांनी कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर ती देण्यात आली आहे.