खानापुर सर्कलच्या विकासासाठी कार्यकर्त्यांनी गाठले मंत्रालय
देगलुर (मारोती हणेगावे) देगलुर बिलोली मतदारसंघ पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडिला, काँग्रेस पक्षाला भरघोस मतांनी निवडून दिल्यानंतर या निवडणुकीत नऊ सर्कल पैकी खानापूर सर्कल सर्वाधिक लीड दिल्यामुळे या लीडचे श्रेय खानापुर सर्कलचे प्रभारी जिल्ह्याचे नेते चव्हाण यांचे अत्यंत बालाजीराव पाटील पांडागळे यांच्या नेतृत्वामुळे जनतेला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी तालुक्यातील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते जिल्हा परिषद शिक्षण स्वीकृत सदस्य बसवराज पाटील वन्नाळीकर, तडखेल नगरीचे सरपंच सुनील पाटील तडखेलकर, खानापुरचे माजी सरपंच चिरंजीव शिवकुमार ताडकोले, या तिघांनी सर्व सामान्य जनतेच्या विकासासाठि पांडागळे यांच्या नेतृत्व मध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांची त्यांच्या मुंबईतील मेघदूत या निवासस्थानी जाऊन खानापूर सर्कलमधील सर्वांच गावांचा समावेश करून सविस्तर अशी चर्चा करून मोठी निधी देण्यात यावी यावर त्यांनी संबंधित विभागांना तसे पत्र दिले व सकारात्मक असा प्रतिसाद दिला.
तसेच निवांत पणे वेळ दिले व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एसी, एसटी प्रमाणेच इतर विद्यार्थ्यांना सुद्धा शालेय गणवेश मोफत देण्यात यावी या मागणीचे निवेदन सुद्धा त्यांनी चव्हाण यांना दिले. खानापुर सर्कलच्या विकासासाठि कार्यकर्त्यांनी मंत्रालय गाठले त्यावेळेस त्यांना मंत्रालयामध्ये विधान परिषदेचे आमदार अमर राजूरकर, देगलूर बिलोलीचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी सर्वतोपरी मदत दिली. जनतेच्या विकासामध्ये नेहमी अग्रेसर रहा तुम्हाला वाटेल ती मदत दिली जाईल असे शब्द त्यांनी दिले. यामुळे जनतेच्या अपेक्षा ह्या निष्ठावान कार्यकर्ता कडून वाढलेल्या आहेत.