लॉजींग प्रकरणी बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा ; भूषण पाटील यांची मागणी
धुळे : नेहरू नगर भागातील एकांत लॉजींग प्रकरणी काहींनी षडयंत्र रचुन बदनामी केल्याने त्यांच्याविरोधात फौजदारी कायदा कलम १५४ प्रमाणे गुन्हा दाखल करावा अशी मागणी भुषण पाटील यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
भुषण पाटील यांनी पोनि हेमंत पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कायदेशीररित्या लॉजींग व्यवसायासाठी परवानगी घेतली असून लॉजींग व रेस्टॉरंट या ठिकाणी सुरू आहे त्याच जागेत बॉईज हॉस्टेल असून ११ विद्यार्थी वास्तव्यास आहेत. हॉस्टेलमध्ये ५ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून ते २४ तास सुरू असतात. तसेच लॉजींगमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून ओळखपत्र घेतले असून लॉजमध्ये प्रवेश दिला जात नाही. शासनाने घालुन दिलेल्या अटी शर्थीचे देखील पालन केले जाते. परंतु दोन दिवसांपूर्वी स्थानिकांची तक्रार नसतांना काही महिला व नागरीकांनी एकत्र येवून लॉज बाबत तक्रार केली. परंतु असा कुठलाही प्रकार होत नसल्याचे भुषण पाटील यांनी म्हटले आहे. त्यांच्यासह डॉ. संजय पिंगळे, रघुनाथ सुर्यवंशी, मयुर सुर्यवंशी, प्रितेश अग्रवाल, अक्षय देव आदी उपस्थित होते.