कृषी धोरण २०२० अंतर्गत शेतकऱ्याने भरले लाखो रुपयांचे वीज बिल
तळोदा (दिपक गोसावी) कृषी धोरण २०२० अंतर्गत आज रोजी तळोदा येथील शेतकरी निसार मक्रानी यांनी लाखो रुपयांचा विजबिलाचा भरणा केला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वसंतराव नाईक कृषि निष्ठ पुरस्कार प्राप्त असलेले तळोदा तालुक्यातील प्रगतशील शेतकरी, जे सर्व समाजाला घेऊन चालतात असे निसारभाई नेहमी विज वितरण कंपनीसही तेवढेच सहकार्य नेहमी करत असतात. असे हाजी निसारअली शेरमोहम्मद मक्रानी हे स्वतः शेतकरी असून आपल्या शेतात नेहमी नवनवीन प्रयोग ते करीत असतात आणि त्यातून लाखो रुपयांचे उत्पन्न ही मिळवीत असतात.ते आपल्या शेतीबरोबर व इतरही काही लोकांची भाड़े तत्वावर शेती ते स्वतः करतात.त्या माध्यमातून आजच्या परिस्थितीत सर्व शेती बागायत करण्यासाठी एकूण २७ विद्युत पंप्पाचा ते वापर करत असतात. त्यांच्या त्या २७ पंपाच्या संबंधित असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांची विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ३ वेळा भेट घेतली व भेटीमध्ये निसार मक्राणी हे सुद्धा हजर होते. त्यांनी भेटीत ही योजना समजून घेतली.
तलोदा तालुका नंदुरबार येथे लोक अदालत भरविण्यात आली होती. हेच औचित्य साधत विद्युत वितरण कंपनी मार्फत तळोदा येथील न्यायालय परिसरातच कृषि विज बिल मेळावा आयोजित करण्यात आला होता.त्यात ग्राहकाना कृषी धोरण २०२० ही योजना समजावून सांगण्यात येत होती. या वेळी निसार मक्राणी हे देखील उपस्थित होते. व त्यांनी त्यांच्या सर्व शंका उपस्थित अधिकाऱ्यांना विचारल्या व सविस्तर चर्चा केली.व आज दुपारी विज बिल भरतों अस आश्वासन दिले. त्यानुसार दुपारी कंपनीच्या कार्यलायत जाऊन कृषी धोरण २०२० अंतर्गत एकूण २० विज बिलांची थकबाक़ी रक्कम रुपये पंधरा लाख तेविस हजार सत्तर रुपये एवढी रक्कम चेक व कॅश अशा स्वरुपात त्यांनी भरणा केली व थकबाकी तून ते मुक्त झाले आहेत.त्यांच्या या अनमोल सहकार्याबद्दल त्यांचा शाल व पुष्प गुच्छ देवून महावितरण च्या वतीने उपकार्यकारी अभियंता तळोदा तिरुपती पाटील, सहा. अभियंता तळोदा चेतन पाचपाण्डे, कनिष्ठ अभियंता बोरद विलास गुरव यांनी सन्मान केला.
एवढया वर न थांबता निसारभाईंनी अजुन आपली ९ बिलांची थकबाकी रक्कम रुपये सात लाख अठरा हजार आठशे वीस रुपये ही २५ तारखे पर्यंत भरण्याचे आश्वासन देखील दिले आहे. तसेच इतर ठिकाणी आपन स्वतः जनमित्रा सोबत जावून वीजबिल भरण्याबाबत शेतकऱ्यांना आवाहन करु असे सांगितले आहे. सदर वसूली होणेकमी वरील दोन्ही कक्ष अभियंता बोरद येथील विलास गुरव व एकूण ३ जनमित्र बी.एन.राजपूत, ए.एच. कलाल, आनंदसिंग गिरासे, बिलिंगचे सर्व कर्मचारी यांनी नियोजनबध पद्धतीने मेहनत घेतली असे तिरुपती पाटिल उपकार्यकारी अभियंता. म.रा.वि.वि.कं.मर्या. तळोदा उपविभाग यांनी सांगितले.
ग्राहकांना विजबिलात माफी देण्यात येत आहे – तिरुपती पाटिल
कृषि धोरण २०२० ही अतिशय चांगली योजना असून यात ग्राहकांना अतिशय चांगली विजबिलात माफी देण्यात येत आहे. योजनेची शेवटची मुदत ३१ मार्च आहे. तरी सर्व शेतिपम्प विज ग्राहकाना विनंती की या योजनेत सहभाग घेवून थकबाक़ी मुक्त व्हावे, असंही उपकार्यकारी अभियंता तिरुपती पाटिल म्हणाले.