जळगाव जिल्हा

भारतीय सैन्य दलातील कार्यरत असलेल्या मुलांच्या आई-वडिलांचा सन्मान सोहळा

मुक्ताईनगर (सचिन झनके) ग्रामीण (शैलेश गुरचळ) स्वराज्याचे मालक छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त स्वाभिमानी शेतकरी संघटना ,बहुजन मुक्ती पार्टी व युवाशक्ती प्रतिष्ठाण मुक्ताईनगर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेल्या मुक्ताईनगर शहरातील भूमिपुत्र सैनिकांच्या आई-वडिलांचा सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम घेण्यात आला.

सुनील अजाबराव कोळि, अनिल अजाबराव कोळि यांचे आईवडील उषा अजाबराव कोळि, नरेश लोखंडे यांचे आई वडील प्रमिला सुभाष लोखंडे, मोहम्मद फरहान खान यांचे वडील मोहम्मद यासीन खान यांचा सन्मान छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन करण्यात आला. यावेळी उपस्थित स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे, बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सौंदाळे, युवाशक्ती प्रतिष्ठानचे पंकज कोळी, साईमतचे पत्रकार अमोल वैद्य, सचिन झनके, त्रिशूल मराठे, सचिन पाटील, अनिकेत सोनार, वैभव इंगळे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे