बोदवडच्या तरुणाचा जामनेरात संशयास्पद मृत्यू
बोदवड (प्रतिनिधी) येथील काग नदीच्या बोदवळ पुलाखाली बोदवड येथील शुभम नंदू माळी (वय २५) या युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. शुभमचा अपघात झाला की त्याचा खून करून मृतदेह पुलाखाली फेकून देण्यात आला. याबाबत घटनास्थळी उलटसुलट चर्चा सुरू होती.
येथील शुभम नंदू माळी हा युवक पहूर येथील खाजगी ट्रकवर चालक म्हणून काम करीत असल्याची माहिती स्थानिक लोकांनी दिली. शुभमने पहूर येथे आपल्या ट्रक खाली केला व ट्रक मालकाच्या ताब्यात देऊन तो बोदवडकडे मोटरसायकल क्रमांक एम एच १९ डी एस २६४१ घेऊन निघाला अशी माहिती मिळाली. बोदवडकडे जात असताना त्याचा मृतदेह जामनेर शहराला लागून असलेल्या काँग नदी बोदवळ पुलाखाली आढळून आला आहे. तरी त्यांची मोटरसायकल त्याच पुलाखाली काही अंतरावर आढळून आली. या घटनेने जामनेर शहरात घात की अपघात याबाबत उलटसुलट चर्चा होत आहे.
या घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस निरीक्षक किरण शिंदे हे आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी जाऊन मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता. मृताच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. त्यांच्या पश्चात आई बहिणी असा परिवार असून तो चार बहिणीचा एकुलता एक भाऊ होता.