शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बोदवडतर्फे पळसखेड येथे श्रम संस्कार शिबीर संपन्न
बोदवड (यशवंत सावरीपगार) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बोदवड कौशल्ये रोजगार उदयोजक्ता व नावीन्यता विभाग वेवसाय शिक्षण वप्रशिक्षण संचालनालंय महाराष्ट्रा राज्य मुंबई एक दिवसीय श्रम संस्कार शिबीर पळसखेड येथे संपन्न झाले.
यावेळी प्राचार्य टी आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबविणे, परिसरातील साफसफाई करणे, गावातील महिला व युवा वर्ग यांना व्यवसायाचे महत्व पटवून प्रशिक्षण देणे, शिलाई मशीन, ड्रेस मेकिंग घरगुती इलेक्ट्रिक उपकरणे दुरुस्ती तसेच महिलांना स्वरक्षण व साक्षरतेचे महत्व पटून देणे, श्रमदानातून गावातील रस्ते तयार करणे पिण्याच्या पाण्याची टाकी स्वछ करणे, गावातील जनजागृती आधारित प्रभात फेरी काढणे, तशेच गावत वृषारोपण करणे इत्यादी उपक्रम श्रम संस्कार शिबिरामध्ये घेण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्तिती येस. एन पाटील, गटनिदेशक साळुंके, रा.से .यो. कार्यक्रम अधिकारी प्रमुख उपस्तिती सुनील चौधरी, सरपंच राहुल मोरे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर सोनवणे, के.जे.सहाय्यक अधिकारी एस.ए.पाटील, टी के पाटील, सागर पाटील, विकास पाटील, कार्यक्रमाला एस.एन.पाटील यांनी दिप प्रज्वलन करून सुरवात केली व सर्व प्रशिषणार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.