आर्वी दूरक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांचे टिमवर्क चांगले : पोलिस अधिक्षक
धुळे : तालुक्यातील आर्वी पोलीस दुरक्षेत्रात जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, धुळे तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील , साहाय्यक पोलीस निरीक्षक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रकाश पाटील यांच्या नियोजनातून आर्वी पोलीस दुरक्षेत्रात गडावर पायी जाणाऱ्या भाविकांना मठाचे वाटप करण्यात आले. तसेच स्वामी समर्थ केंद्रात वृक्षारोपण करण्यात आले.
धुळे तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत आर्वी पोलीस दुरक्षेत्रात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. प्रकाश पाटील यांनी आर्वी परिसरातील नागरिकांशी समन्वय साधल्याने आर्वी परिसरातील गुन्हेगारीचे प्रमाण खूप कमी झाले आहे. कर्मचाऱ्यांचे चांगले टिमर्वक आहे. जनतेचे त्यांना सहकार्य असल्याने समाजकार्य होत आहे. गडावर पायी जाणारे भाविकांसाठी अनेक ठिकाणी अन्नदानाचे वाटप केले जाते. आपणही समाजाचे देणे लागतो. त्यामुळे आणि आपल्याही हातून चांगले समाजकार्य घडावे. पोलिसांनी केलेल्या उपक्रमांचा जनतेने एक चांगला आदर्श घ्यावा, असे जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी सांगितले कार्यक्रमापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांच्याहस्ते थंडगार मट्टा वाटप करण्यात आला. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी पोलिस अधीक्षक यांनी पाहणी करून पाणी, दुध व स्वच्छता याविषयी विशेष काळजी घेण्यास सांगितले. पोलिस उपनिरीक्षक प्रकाश पाटील यांच्या उपक्रमांचे कौतुक केले. हेमराज पाटील, दिपेश पाटील, संदेश सोनवणे, भुपेद्र डापसे, हर्षल शिंदे, महेश विंचू यांच्यामार्फत मोफत औषधे वाटप केली जात आहेत. मठा वाटपाच्या वेळी पोहेकॉ योगेश सोनार, पो का भूषण पाटील, पवन मंडाले, गणेश बोरसे, चंद्रकांत माळी, नितीन दिवसे, निलेश पाटील, जि.प. सदस्य किशोर आलोर, पं.स. सदस्य जिभाऊ शेनगे, पं.स.चे माजी सभापती भगवान गर्दे, पं. स. सदस्य दिलीप देसले, सरपंच नागेश देवरे, उपसरपंच विश्वनाथ सोनवणे, ग्रामविकास अधिकारी सुनील देसले, ग्रामपंचायत सदस्य किशोर देवरे, माजी सरपंच संजय चौधरी, माजी सरपंच भगवान दुकळे, मनोज साळवे, वासूदेव महाराज, विठ्ठल पाटील, अरुण अहिरे, राहूल सुर्यवंशी, पत्रकार युवराज हाके, जवाहर बागले, नाना मस्के, किशोर गुरव, रुपेश पाटील, मंगेश बागुल आदी उपस्थित होते.