5 लाखांची बॅग परत केल्याबद्दल साळवे गावातील अमोल भारती याचे सर्वत्र कौतुक !
साळवे : सध्याच्या स्वार्थी युगात प्रामाणिकपणा हा क्वचितच पाहायला मिळतो याचे प्रचिती देणारे उदाहरण नुकतेच साळवेच्या तरुणाच्या कृत्यातुन पाहायला मिळाले. चिमठाणा येथील एकता टी हाऊस हॉटेलमध्ये सापडलेली बॅगेत 3 तोळे सोने व रोकड़ रक्कम मिळाल्यानंतर पैशांचा व सोन्याचा मोह न ठेवता त्या बॅगेच्या मुळ मालकाचा शोध घेत त्यास बॅग परत करत प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले आहे. मुकुंद पाटिल असे या तरुणाचे नाव असून शहादा तालुक्यातील तऱ्हावद गावात ते राहतात.
मुकुंद पाटिल हे गुरुवारी दुपारच्या सुमारास गाडीवरुन पुण्याहुन आपल्या घरी परतत असतांना धुळे ते दोंडाईचा रस्त्यावरील चिमठाणा चौफुलीवर एकता टी हॉउस हॉटेलमध्ये मुकुंद पाटिल यांना अनावधानाने बॅगचा विसर पडला व ते गावाकड़े रवाना झाले. साळवे येथील चि.अमोल भारती त्याठिकाणी गेले असता ती बॅग त्यांच्या निदर्शनास आली व बॅग पाहिली असता त्यांना बॅगेत 3 तोळे सोने व रोकड़ रक्कम असे एकूण 5 लाखच्या सुमारास रक्कम लक्षात आली. बॅगेत मिळालेल्या ओळख पत्रावरुन मुकुंद पाटिल यांचे असल्याचे लक्षात आले, त्यात मिळालेल्या नंबरवरून त्यांच्याशी संपर्क साधुन सदर बॅगेची माहिती दिली. बॅग परत मिळालेली पाहुन त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आणि समाधान होते ते आम्हाला सुखावून गेले.
अमोल भारती याचे प्रामाणिकपणाचे कौतुक केले तुम्ही माझी बॅग मला जशीच्या तशी मला परत दिली त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. तुमचा प्रामाणिकपणा प्रसंशनीय आहे, आजच्या काळात हे दुर्मिळ होत चालले आहे तुम्ही जी माणुसकी दाखवलीत ती सुद्धा स्तुती योग्य आहे अशी कौतुकाची थाप दिली. या घटनेतूनच समाजात आणि लोकांमध्ये आजही प्रामाणिकपणा, आत्मीयता टिकून आहे याची प्रचिती येते. या घटनचे सर्वत्र चिमठाणा परिसरात कौतुक होत आहे.
अविस्मरणीय कामगिरी केल्याबद्दल अमोल भारती यांचे स्पीड न्यूज तर्फे मनापासून अभिनंदन