पुळुज येथील जिल्हा परिषद शाळेत निरोप समारंभ
मोहोळ (श्रीराम सोलंकर) पुळुज येथील जिल्हा परिषद शाळा निरोप समारंभ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाची शिक्षण माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष अँड. श्रीरंग लाळे हे होते.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाळे यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मागदशॅन केले. यावेळी बोलताना अँड. श्रीरंग लाळे यांनी विद्यार्थी कशा पद्धतीने घडवले पाहिजे याचे मार्गदर्शन केले. देशासाठी या लहान वयात देश प्रेम रुजवण्यात त्यांच्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार करणे, या गोष्टीचे प्रामुख्याने काम करण्याचे त्यांनी शिक्षकांना आवाहन केले. यावेळी विद्यार्थ्याकडून शाळेला भेट वस्तू देण्यात आल्या. सर्व शिक्षकांचे मानसन्मान करण्यात आले. हा निरोप समारंभ खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. अँड. श्रीरंग लाळे यांचे विचार ऐकून विद्यार्थी भारावून गेले. शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक वर्ग याने अनमोल सहकार्य करूण हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.