डॉ. रणजीत गायकवाड यांनी गोळवाडी येथे केली इफ्तार पार्टीचे आयोजन व मार्गदर्शन
वैजापूर : मुस्लीम बांधवांच्या उपवासाच महिन्याला प्रारंभ झाला आहे. यालाच ‘रमजान’चा अर्थात ‘बरकती’चा महिना म्हणतात. मनामनातील दरी कमी करून परस्परांमध्ये स्नेहभाव, सद्भाव वाढविणारा हा महिना. संयम, त्याग, शांती, सहिष्णुता, चांगुलपणा, प्रामाणिकपणा माणसांच्या ठायी रुजविणारा हा महिना. माणसाला वाईटापासून, वासनेपासून शेकडो मैल दूर ठेवणारा हा महिना.
मनाचं मागणं पूर्ण करणाऱ्या, बरकतीची मुक्तपणे उधळण करणाऱ्या या महिन्याच्या चंद्राची तमाम मुस्लीम बांधव अधीरतेने प्रतीक्षा करीत असतात. चंद्राच्या दर्शनाने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेची पहाट फुलत असते. घरादारात, मुहल्ल्यात आनंद भरभरून ओसंडत असतो. ‘चाँद दिख, चाँद दिख’चा गलका आसमंतात चैतनचे कारंजी उडवू लागतो. मुस्लीम बांधव आपापसातील वैरत्व, द्वेष विसरून हस्तांदोलन करतात, आलिंगन देतात. त्यांच्या निखळ जिव्हाळने सबंध माहोल स्नेहमय होऊन जातो. संपूर्ण महिनाभर अत्यंत कडकडीत रोजे, पाच वेळेचा नियमित नमाज, कुराणपठण अन् अल्लाहचे स्मरण, चिंतन करायचे असते. या तीस दिवसात उपासधारकांच्या तनमनाची शुद्धी होते. म्हणून इस्लाम धर्मात रमजान महिन्याला अन्य साधारण महत्त्व देण्यात आले आहे. हा महिना अत्यंत पवित्र अन् मंगलमय मानला गेला आहे. असे मार्गदर्शन करून समस्त गोळवाडी मुस्लिम बांधवा संगे डॉक्टर रणजीत यांनी इफ्तार पार्टी साजरी केली.