चोपडा
सुंदरगढी भागातील गरजुंना ब्लँकेटचे वाटप
चोपडा (प्रतिनिधी) शहरातील सुंदरगढी भागालगत मागासवर्गीय वस्तीतील गरिब व गरजु व्यक्तींना आशेचे द्वार प्रतिष्ठान पुणे व ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे समाजसेवक विशाल हिवरे यांचे शुभहस्ते वाढत्या थंडीत उपयुक्त अशा रजई ब्लँकेटचे मोफत वाटप करण्यात आले. यासाठी भारत सरकार संलग्न ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे चोपडा तालुकाध्यक्ष प्रविण सत्तेसा, सचिव असदअली सय्यद व सर्व सदस्य मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले.