चोपडा
सनपुले येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
चोपडा (सिद्धार्थ बाविस्कर) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती सनपुले येथील जय भीम मित्र मंडळ यांनी सकाळी ७:३० वाजेला अत्यंत नियोजनबद्ध साजरी करण्यात आली.
त्यासाठी सर्व डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रेमी बंधू भगिनीं मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. या प्रसंगी ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, पोलीस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी सामाजिक कार्यकर्ता विजय बाविस्कर व वासुदेव बाविस्कर यांना पुष्पहार अर्पण केले.
तसेच समाज बांधव, ज्ञानेश्वर मोरे, हिरामण पाटिल, डॉ.पारस पाटिल, हिरालाल बाविस्कर, अनिल बाविस्कर, रामदास बाविस्कर, बाबुराव बाविस्कर, उत्तम मोरे, पंकज मोरे, युवराज बाविस्कर, उत्तम बाविस्कर, प्रवीण बाविस्कर, गौतम बाविस्कर, आनंद बाविस्कर इत्यादी समाज बांधव उपस्थित राहून अभिवादन करण्यात आले.