जन कल्याण संघच्या सौजन्याने मुली व महिलांना शिलाई मशिन व प्रमाणपत्र वितरण
धारणी (प्रतिनिधी) डॉ .सुशिला नायर हॉस्पीटल उतावली येथे जन कल्याण संघ मुंबईच्या सौजन्याने ५६ मुली व महिलांना शिलाई प्रशिक्षण दिले होते. तसेच आता या मुली व महिलांना कैची व शिलाई मशिन व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतीथी म्हणून प्रदिप सेवाळे, तहसीलदार धारणी गजानन पाडे, जिल्ला प्रमुख महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना सचिन सानप, जिल्हा समनवयक, महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य, योजना व संस्थेची प्रमुख डॉ. शकुणतला छाबडा उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला यशस्वी पार पाडण्यासाठी मनोज कानडे, टेन्जीन डोलमा, हर्षा तेजने, सपना मित्रे, सुरुची भाग्यवंत, प्रिती मालविय, शितल पेडोले, ममता राठोड़, नितेश पवार, अन्नपूर्णा राठोड जोयेब अली, सागर धनेवार, शिवलाल, प्रकाश, अंकीत, दिलीप, आदिल, डॉ. कांचन, डॉ.रजनी, डॉ. शितल, डॉ. श्रद्धा, विक्रांत मोहोद, राठोड, मिलन राजश्री व सर्व हॉस्पीटल स्टाफने सहकार्य केले.