महाराष्ट्र
बोदवड येथे आबासाहेब पाटील यांचा शाल, श्रीफळ तथा वृक्षरोप देऊन सन्मान
बोदवड (प्रतिनिधी) आज गणेश चतुर्थी निमित्तानं बोदवडचा राजा वंदननिय बाळासाहेब ठाकरे नगरीत लग्नाचा वाढदिवस असलेले आबासाहेब पाटील (आदर्श गाव मानमोडीकर) हे सहकुंटूंब बाप्पाजींच्या दर्शनासाठी आले असता श्री गणेश मंदिराच्या अध्यक्ष प्रमिला संजय वराडे यांनी शाल, श्रीफळ तथा वृक्षरोप देऊन सन्मान केला.
यावेळी वेळोवेळी श्री गणेश मंदिराच्या प्रत्येक कार्यक्रमात आपल्या हाताने रूची आणून महाप्रसादात अनमोल सहकार्य देणारे विशाल प्रभूजी यांचाही सत्कार अध्यक्ष यांनी श्री गणेशाची प्रतिमा व शाल श्रीफळ देऊन केला. यावेळी सायंकाळची आरती नगरसेविका
योगिताताई गोपाल खेवलकर यांनी सपत्निक व सोबतीला गिताताई संजय पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाली.