१ लाख ६६ हजारांचा अवैध गुटखा जप्त ; दोघांना अटक
धारणी (पंकज मालवीय) तालुक्यात आजपर्यंत खंडवा तथा बुरहानपूर या दोन शहरातूनच प्रतिबंधित गुटख्याची तस्करी होत असे, परंतु आता तस्करांनी अकोला येथून मेळघाटात सुगंधीत गुटख्याचा व्यवसाय सुरू आहे. शनिवार, १९ फेब्रुवारी रोजी दुपारी सुसर्दा चौकीतील पोलिस हवालदार प्रवीण बोंडे, जीवन गोळंबे व होमगार्ड यांनी डाबका पोलीस पाटील कमलसिंग वाघमारे यांच्या सहकार्याने दोन बाईक अडवून दोन पोते विमल गुटखा पाऊच जप्त करुन दोघांना अटक केली. बाईक तथा गुटखा मिळून १ लाख ६६ हजाराचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.
पोलिस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनात गुन्हा कायम करण्यात आलेला आहे. आरोपी शाहरुक खान खुर्शीद खान (२५) रा. हिवरखेड जि. अकोला तथा अशफाक खान मुर्तुजाझान (४२) रा. विचारी ता. तेल्हारा यांना जेरबंद करुन दुचाकी जप्त करण्यात आली आहे. उपरोक्त दोघेही सावलीखेडा, सुसर्दा, धुळघाट, डाबका, गोलाई व राणीगावसह अनेक गावात घरपोच गुटखा पोहचविण्याचे काम करीत असल्याची माहिती मिळाली होती. तालुक्यातील सुसर्दा बिट हददीमध्ये डाबका येथे खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असता गोपनियमाहिती मिळाली की सावलीखेडा ते धुलघाट रेल्वे मार्गावर दोन इसम त्यांचे मोटर सायकलने शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा वाहतुक करून धुलघाट रेल्वे कडे जाणार आहेत. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सावलीखेडा येथील बाजार चौक येथे पोहचलो व पंचनाम्यातील नमुद पंचाना बोलावुन मिळालेली माहीती समजवुन सांगितली व पंचासह तेथे नाकाबंदी केली असता १२.४० वा सावलीखेडा बाजार चौकाकडे २ मोटारसायकल येतांना दिसल्या. सदर मोटारसायकल तेथे थांबवुन पाहणी केली असता मोसा क्र. एमएच 30 बीपी 4923 लाल रंगाची हिरो स्पेल्डर प्लस व मोसा क्र. एमएच 30 बीई 0340 करडया रंगाची हिरो स्पेल्डर प्लस वर दोन पोतडयांमध्ये महाराष्ट्र शासणाने प्रतिबंधीत केलेला विमल पान मसाला व तंबाखु कि ६६००० / – रू व दोन मो सा कि अं १००००० / -रू असा एकुण १,६६००० / – रू चा मुददेमाल आरोपी शाहरूख खान खुर्शीद खान, अशफाक खान मुर्तझा खान यांच्या कडून जप्त करण्यात आला आहे. आरोपींवर गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास सुरू आहे. सदर कार्यवाही अविनाश बारगळ पोलीस अधीक्षक अमरावती ग्रा, शशीकांत सातव, अपर पोलीस अधीक्षक अमरावती ग्रा, गौहर हसन, उपविभागीय पोलीस अधीकारी धारणी यांचे आदेशान्वये सुरेंद्र बेलखेडे, ठाणेदार पोलीस स्टेशन धारणी यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि मिलींदकुमार दवणे, पोहवा प्रविण बोंडे, पोकाँ जिवन गोळंबे, डाबका पोलीस पाटील कमलसिंग वाघमारे यांनी केलेली आहे.