देवभाने गावाजवळ महामार्गावर ट्रकला आग
धुळे (विक्की आहिरे) शहराजवळील मुंबई-आग्रा महामार्ग राष्ट्रीय क्रमांक तीन देवभाने गावाजवळ रस्त्यावर आज सोनगीर हुंन धुळ्याकडे महामार्गामुळे येणाऱ्या ट्रक क्रं एच आर 55 एजे 9611 ला देवभाने रस्त्यावर सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत ट्रक रस्त्याच्या बाजूला थांबवला आगी बाबत पोलिसांना माहिती देण्यात आली.
माहिती मिळताच देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शेख पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. आगी बाबत महानगरपालिका अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी तुषार ढाके यांनी अग्निशामक दलाचा पाण्याचा एक बंब कर्मचारी यांना आगीवर पाणी मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी घटनास्थळाकडे रवाना केले. पोलिसांनी यावेळी महामार्गावरील वाहतूक खबदारीदृष्टीने अन्य मार्गाने वळवली. यात चालकाचा हात भाजल्याचे निदर्शनास येताच त्याला तातडीने उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही मिनीटातच अग्निशामक दलाचा पाण्याचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. फायरमन श्याम कानडे, मनोज सरगर, कुणाल ठाकूर, राहुल पाटील यांनी ट्रकला लागलेल्या आगी वर पाणी मारा करत आग आटोक्यात आणली. यात ट्रक इंजिन केबिनचे नुकसान झाले. ट्रकच्या आत प्लास्टिकच्या टाक्या रंगाचे डबे भरलेला माल होता. अग्निशामक दलाच्या सर्तकतेने आगीवर पाणी मारा करून आग काही मिनिटातच आटोक्यात आणल्याने मोठीहानी आर्थिक नुकसान टळले. या प्रकरणी देवपुर पोलीसांत उशीरापर्यंत अग्निउपद्रव 3 व 7 प्रमाणे नोंद करण्याचे काम सुरू होते.