मोताळा ते कोथळी अर्धवट झालेल्या रस्त्यावर स्वाभिमानी ने लावले “बेशरम चे फुल”
"रस्त्यावर केले दोन तास ठिय्या आंदोलन"
मोताळा (संभाजी गवळी) मोताळा तालुक्यातील रस्त्यांचा प्रश्न खूप गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. असाच एक रस्ता म्हणजे मोताळा ते कोथळी हा रस्ता काही प्रमाणात पूर्ण झाला आहे तर काही प्रमाणात बाकी आहे. कोथळी ते मोताळा ये_जा करण्यासाठी हाच एक रस्ता आहे आणि हाच रस्ता अर्धवट अवस्थेत पडलेला आहे. या रस्त्यात खड्डे आहे की खड्ड्यात रस्ते आहेत हेच जनतेला कळायला मार्ग नाही.खूपच त्रास जनतेला सहन करावा लागत आहे.

म्हणून आज स्वाभिमानीच्या वतीने या रस्त्यावर बेशरम चे फुल लावून रहलेला अर्धवट रस्ता त्वरित डांबरीकरण करून ते काम पूर्ण नागरिकांना न्याय देण्यात यावा. म्हणून स्वाभिमानीच्या पदाधिकारी यांनी रस्त्यावर दोन तास ठिय्या आंदोलन केले. जर येत्या आठवड्याभरात या आंदोलनाची दखल घेतली नाही तर पुढील पंधरा दिवसांमध्ये या रस्त्यावरील गावा मधल्या नागरिकांना घेऊन तीव्र प्रकारचे आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.
यावेळी आंदोलन करताना महेंद्र जाधव, गजानन गवळी, दत्ता पाटील, भागवत धोरण, चंदू गवळी, संदीप गोरे, राजू शिंदे, गजानन तायडे, अंबादास तायडे, गजानन बरडे, प्रीतम साबळे, सागर काटे, सय्यद इम्रान, जबिर खान, बशीर खान, शेख इब्राहिम, मुज्जमिल खान, आणि राजू शिंदे इत्यादी कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.



