महाराष्ट्रराजकीय
ओबीसी वेल्फेअर फाउंडेशनतर्फे ओबीसीचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारला निवेदन !
पुणे (प्रतिनिधी) आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात ओबीसी जनमोर्चा, ओबीसी वेल्फेअर फाउंडेशनतर्फे ओबीसीचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारला जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यासाठी, ओबीसी वेल्फेअर फाऊंडेशन, आद्यक्रांती उमाजी नाईक युवक संघ, महाराष्ट्र राज्य, अखिल भारतीय दशनाम गोसावी समाज संघटना अध्यक्ष नंदकुमार गोसावी यासह इतर ओबीसी संघटना उपस्थित होत्या.
आजच्या या आंदोलन प्रसंगी वंचित बहुजन आघाडी वंचित, पुणे शहर यांच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला. यावेळेस वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र प्रदेश आघाडी उपाध्यक्ष अनिल जाधव व त्यांचे सहकारी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.