भावी नगराध्यक्ष म्हणत नगरपालीकेचे सुत्रे हाती घेण्याचे जनआर्शिवाद देत लोकांनी साजरा केला आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस
दोंडाईचा (प्रतिनिधी) घराणेशाही-राजेशाही अशी काही पुर्वजांनी दिलेली देणगी नसताना. बादशहा, राजा, हुकूमचा एक्का हे सर्व कोणा एका माणसाच्या नशीबात येऊ शकत नाही. पण ते म्हणतात ना, दैवशक्ती ज्याच्यावर मेहरबान-प्रसन्न असते.तेव्हा अशा व्यक्तीकडे ना राज, ना पाट जरी असले नाही. तरी देव अशा व्यक्तीला डोक्यात-खिशात सरस्वती-लक्ष्मीसह कोणत्याही गोष्टींची कमी पडू न देता. रोज उठून त्याच्या हातुन दैनंदिन जीवनात आपल्या संपर्कात आलेल्या लोकांच्या गरजा ओळखत, त्यांच्या अडीअडचणी सोडत बादशहा व राजा बनवून टाकते व कालातरांने हाच व्यक्ती आपल्या सार्वजनिक जिवन जगताना हुकूमचा एक्का स्थान मिळवत. जिथे उभे राहील-जिथे जाईल. तिथे आपली छाप पाडत-किमंत वाढवत.
लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो. त्यामुळे कधी कधी आपली साधी राहणीमान व आपला साधा-भोळा स्वभाव हे जरी आपल्या चारित्र्याचे खरे दागिने असले तरी, आपली वाढती लोकप्रियता-लोकांचा गोतावळा काही जवळून वाढवलेल्या लोकांना व विरोधकांना पचत नाही. तेव्हा हे सामान्य परिस्थितीतून स्वतः वाढवलेले फुटीरवादी लोक व पाचवीला पुजलेले विरोधक क्षणात अशा व्यक्तीची उंची गाठायचा प्रयत्न करत. समोरची व्यक्ती कशी कमी व आम्ही कसे निपुण-गुणवान म्हणत. जनतेमध्ये छाप पाडायचा प्रयत्न करतात. पण ते म्हणतात दैव-शक्ती ज्याच्यावर मेहरबान-प्रसन्न असते. त्याचे हजार दुश्मन जरी निर्माण झाले व नको त्या बाजूने त्रास द्यायचा प्रयत्न केला. तरी त्याचा बाल ही वाकडा करू शकत नाही व शेवटी खरे सोने हे खरे असते व जे पितळ असते ते एक ना एक दिवस जनतेसमोर उघडे पडत असते व असाच काही अडचणी-त्रास विरोधकांसह स्वकियांनीही ज्यांना देयाचा प्रयत्न केला.
तरी कोणत्याही अडचणी-परिस्थितीतून गनिमी काव्यांतुन मार्ग काढत. सदैव आपल्यापर्यंत आलेल्या जनतेच्या गरजा-समस्या सोडवत.ना-राज,ना पाट असताना फक्त दैव-शक्तीच्या बलभुत्यावर बादशहा-राजेशाही सारखे जीवन जगत. लोकांनी ज्यांना आज भावी नगराध्यक्ष म्हणत नगरपालीकेचे सुत्रे हाती घेण्याचे जनआर्शिवाद दिले व चौकाचौकात केक कापत वाढदिवस साजरा करत, आपल्या लाडक्या नेत्याचा मस्तकावर टिळा लावत. सामाजिक व राजकीय जीवनात यशस्वी होण्याचे आर्शिवाद दिले, असे लोकप्रिय नेते डॉ. बापुसाहेब रविंद्रजी देशमुख यांचा वाढदिवस सर्वसामान्य लोकांनी मोठ्या दिमाखात गावात-चौकाचौकात साजरा करण्यात आला आहे.
तरी डॉ. बापूसाहेब ह्यांनी आपला व लोकांचा मागील अडीअडचणींचा काळ पाहत, कोरोना सारख्या परिस्थितीतून बाहेर पडलेल्या लोकांना आपल्या वाढदिवसाठी लवाजमा खर्च न करता. फक्त भेटीगाठीचे नियोजन केले होते. मात्र सर्वसामान्य लोकांचे हे प्रेम आहे की,ज्यांनी आपल्या नेत्याचा चेहऱ्यावर आनंद-हसु आणण्यासाठी हा सर्व खटाटोप केला. म्हणून डॉ. बापूसाहेब मागील काळात आपल्यावर विरोधक व स्वकियांनी दिलेल्या त्रासाकडे पाहत व जे लोक आज त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचा क्षण पाहू इच्छित आहे. त्यांच्यासाठी वाढदिवसाच्या समारोप संध्याकाळी आपल्या जिवनातील घडामोडी संदर्भात जुडणाऱ्या चित्रपटातील चार ओळी सांगितल्या, त्या अशा- जिने के लिए सोचा ही नही! दर्द संभालने होंगे! मुस्कुराये तो, मुस्कूराने के कर्जे चुकाने होंगे! असे म्हणत. चेहऱ्यावर आनंद ठेवत. दिवसभरातील वाढदिवसाच्या कार्यक्रमांची समाप्ती केली.