पंतप्रधान मोदींचे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र ; काँग्रेसकडून घणाघात
धुळ्यात काँग्रेसचे निषेध आंदोलन
धुळे (करण ठाकरे) महाराष्ट्रातील काँग्रेसने कोरोना पसरविल्याचा दुर्भाग्यपूर्ण आरोप करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रासारख्या पवित्रभूमीला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे. भाजपाचे हे घाणेरडे आरोप काँग्रेस कधीही सहन करणार नाही असा घणाघात करीत भाजपावर तोफ डागली.
यावेळी जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन करीत नरेंद्र मोदी यांच्या संसेदतील वक्तव्याचा निषेध नोंदविला. माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रमुख उपस्थितीत आज दि. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वा. धुळे शहरातील महाराणा प्रतापपुतळ्याजवळ धुळे जिल्हा व धुळे शहर काँग्रेसच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व महाराष्ट्रातील काँग्रेसमुळे आणि ७ महाराष्ट्रामुळे देशात कोरोना पसरला व असे बिनबुडाचे आणि दुभाग्यपूर्ण आरोप राज्यसभेत केले. पंतप्रधानांच्या निषेधार्थ आज या निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर आणि धुळे शहर काँग्रेसचे न जिल्हाध्यक्ष माजी आ.प्रा. शरद पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील जनतेचा केलेला अपमान कधापीही सहन केला जाणार नाही असा घणाघात करीत भाजपावर तोफ । डागली. यावेळी पदाधिकार्यांनी निषेध नोंदवित सांगितले कि, फक्त मतांसाठीआणि निवडणूका डोळ्यासमोर ठेवत पंतप्रधानांनी अत्यंत दुर्देवी वक्तव्य राज्यसभेत केले. या देशात नरेंद्र मोदी यांनी नमस्ते ट्रम्प कार्यक्रम आयोजित करून कोरोना वाढविला आहे त्यामुळे स्वताचे पाप लपविण्यासाठी पंतप्रधान काँग्रेस आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रतील जनता आणि महाराष्ट्राची बदनामी आम्ही कधापीही सहन करणार नाही असा घणाघात यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाम सनेर आणि शहराध्यक्ष माजी आ. प्रा. शरद पाटील यांनी केला. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले आणि कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील यांच्या सुचनेनुसार हे निषेध आंदोलन करण्यात आले आले.
यावेळी माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्यासोबत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शामकांत सनेर, शहराध्यक्ष माजी आ.प्रा. शरद पाटील, बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दरबारसिंग गिरासे, ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे, माजी विरोधी पक्षनेते साबीर शेठ, माजी आ.डी.एस.अहिरे, तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष अशोक सुडके, इंटकचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सिसोदे, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष बानुबाई शिरसाठ, काँग्रेस किसान महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा जयश्री खैरनार, माजी जि.प. सदस्य साहेबराव खैरनार, अवजड वाहतूक काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब पाटील, जि.प. सदस्य अरुण पाटील, डॉ. एस. टी. पाटील, सरपंच प्रकाश पाटील, माजी सरपंच सोमनाथपाटील, माजी नगरसेवक मुझफ्फर हुसैन, सभापती प्रतिभा सुर्यवंशी माजी पं.स. सदस्य छोटूभाऊ चौधरी, माजी सरपंच हिरामण पाटील, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गणेश गर्दै, ज्येष्ठ नेते किर्तीमंत कौठळकर, भिवसन अहिरे, राजेंद्र खैरनार, नंदुभाऊ खैरनार, युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस राजीव पाटील, माजी नगरसेवक सदाशिव पवार, माजी उपसरपंच जगदिश चव्हाण, प्रा. मुकेश पाटील, जावेद देशमुख, माजी सरपंच शिवाजी अहिरे, प्रविण माळी, पंकज चव्हाण, राजेंद्र देवरे, राहूल माणिक, पंडीत पाटील, उत्तम देसले, रमेश अहिराव, भानुदास गांगुर्डे, याकुब पठाण, हुसैन बोहरी आदी उपस्थित होते.