देगांव गावातील महर्षि वाल्मीकि ऋषि स्तंभचे भुमिपुजन सपंन्न
मालपूर (गोपाल कोळी) देगांव गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शिंदखेडा तालुक्यातील देगांव गावात आदीवासी टोकरे कोळी जमातींचे दैवत रामायण कार आद्यकवी महर्षि वाल्मीकी ऋषि स्तंभचे भुमिपुजन देगांव गावातील जेष्ठ नागरीकांच्या हस्ते पार पडले.
वाल्या सेना गृप च्या माध्यमातून देगांव गावात महर्षि वाल्मीकि ऋषि स्तंभ चे काम सुरू करण्यात आले असून दानशूर दात्यांच्या देणगीतुन व वाल्या सेना गृप देगांवच्या युवकांच्या श्रमदानातून येत्या आठ हा संकल्प पुर्ण करण्यात येणार असून येत्या चैत्र शु.पौर्णिमा हनुमान जयंती ला महर्षि वाल्मीकि ऋषिंची मुर्ती स्तंभावर स्थापित करण्यात येणार आहे.
यावेळी गीतांजली कोळी भुषण कोळी, श्रीकांत कोळी आकाश कोळी, समस्त वाल्या सेना गृप महाराष्ट्र राज्य नहाणू कोळी, मोतीलाल आबा, शालिक ईशी, देवाजी ईशी, भुरा दादा, भाऊसाहेब कोळी, ज्ञानेश्वर कोळी, राजू कोळी, तिला कोळी, राजधर महाराज, गणेश कोळी, राहुल कोळी, तुकाराम दादा, व वाल्या सेना ग्रुप चे सर्व कार्यकर्ते तसेच समस्त ग्रामस्थ देगांव उपस्थित होते.