येत्या सन व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बोरद येथे पोलीस अधीक्षकांच्या समवेत शांतता कमिटीची बैठक संपन्न
बोरद (योगेश गोसावी) उद्यापासून सुरू होणाऱ्या रमजान ईद, व आंबेडकर जयंतीच्या व रामनवमीच्या पार्श्वभूमीवर बोरद येथे शांतता कमिटीची बैठक पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील काही कारणास्तव उपस्थित न झाल्याने उपविभागीय अधिकारी संभाजी सावंत अक्कलकुवा यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली. यावेळी बोरद येथील सर्व समाजाचे वरीष्ठ बांधव मोठ्या संख्येने हजर होते.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याकारणाने कुठल्याही प्रकारचे सन उत्सव साजरा करण्यात आले नव्हते या वर्षी शासनाकडून सर्व प्रकारचे निर्बंध शिथिल करण्यात आल्याने सर्व सन उत्सवाला परवानगी देण्यात आली आहे. या वेळी संभाजी सावंत यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की,सन उत्सव साजरा करताना पारंपरिक वाद्यांना महत्व दिले गेले पाहिजे डी. जे.ला अधिक महत्त्व देण्यात येऊ नये कारण सुप्रीम कोर्टाने ही त्याला मंजुरी नाकारली आहे. या वेळी उदाहरण देतांना ते म्हणाले की, ज्यांच्या लग्नात डी. जे.वाजवण्यात आला त्यांचे संसार खूपच कमी काळ टिकले.जर वाद्य मंगल असेल तर जीवनही मंगल मय होईल हे प्रत्येकाने लक्षात घ्यावे.व येणारी रमजान, आंबेडकर जयंती,व रामनवमी उत्सव शांततेने पार पडावेत.जेणे करून परिसरात शांतता लाभेल आणि पोलिसांकडून आपल्याला योग्य असे सहकार्य लाभेल.आपलं ही सहकार्य आमच्यासाठी महत्वाचे असेल असे त्यांनी सांगितले. या वेळी तळोदा पोलीस अधिकारी केलसिंग पावरा.उपाधिकारी अमितकुमार बागुल हे उपस्थित होते. यावेळी संभाजी सावंत यांना राष्ट्रपती पदक प्राप्त झाल्याने बोरद गावातील अनेक बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ते म्हणाले की गेल्या ३३ वर्षात मला एवढं प्रेम कुठेच मिळालं नाही. यावेळी उपस्थितांना अनेकांनी मार्गदर्शन केले. त्यात दयानंद चव्हाण, दत्तात्रय पाटील, भिकलाल ढोडरे हे होते.
यावेळी पंचायत समिती सदस्य विजय राणा यांनी जुन्या चित्रपटातील गीत गात साहेबांना शुभेच्छा दिल्या. या सभेच्या वेळी प.स.सदस्य विजय राणा, कु.उ.बा. समिती सदस्य दत्तात्रय पाटील, भिकलाल ढोडरे, कन्हैयालाल ढोडरे, ऊंनीस तेली, कॉ.मंगलसिंग चव्हाण, सुकलाल ठाकरे, मंगेश पाटील, दयानंद चव्हाण, भावराव बिरारे, विठ्ठल ढोडरे, मच्छिद्र ढोडरे, रवींद्र वरसाळे, गणेश भामरे, सोमनाथ बिरारे, मिलिंद पाटील, रवींद्र भिलाव, इस्माईल तेली, तसेच बोरद पोलीस दुरक्षेत्राचे हवालदार गौतम बोराडे, विजय विसावे, तुकाराम पावरा, राजू जगताप, अजय कोळी, अजय पवार, रघुवीर रामोळे, अनिल पाडवी, सुभाष पावरा इत्यादी कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.



