महाराष्ट्र

सोयगाव येथे लवकरच उभारणार छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा-राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची घोषणा

आठ दिवसात प्रस्ताव सादर करा ; पुतळा उभारण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही

सोयगाव( विवेक महाजन,तालुका प्रतिनिधी ) : सोयगाव येथे लवकरच छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वरूढ पुतळा उभारणार असल्याची घोषणा महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोयगाव येथील आढावा बैठकीत केली. याबाबत आठ दिवसाच्या आता परिपूर्ण प्रस्ताव सादर करा अशा सूचना देत यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून रीतसर परवानगी मिळवून देवू सोबतच यासाठी निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी याप्रसंगी केले.

सोयगाव शहरातील जुना बाजार चौक भागात गुरुवार ( दि.18 ) रोजी शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी तसेच शहरातील नागरिकांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारण्यासाठी सर्वांचे एकमत झाले. अनेक दिवसांपासून प्रलंबित मागणीच्या विषयावर मार्गदर्शन करीत असतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार बोलत होते.

यावेळी उपविभागीय अधिकारी संजीव मोरे, तहसीलदार रमेश जसवंत, एपीआय सुदाम सिरसाट, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, तालुकाप्रमुख प्रभाकर (आबा ) काळे, तालुका संघटक दिलीप मचे, पंचायत समिती सभापती प्रतिभा जाधव, जि. प.सदस्य गोपीचंद जाधव, माजी उपसभापती उस्मान पठाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलत असतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, सोयगावच्या गैर सोयी दूर करण्यासाठी येथे सुसज्ज विविध शासकीय कार्यालय उभारण्यासाठी व सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी जवळपास 100 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच सोयगाव शहरात मूलभूत व पायभूय सुविधेसाठी नगरविकास विभागाच्या वतीने 5 कोटी 72 लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली असून लवकरच नगरविकास मंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते या विकास कामांचे भूमिपूजन होणार असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

सोयगाव आमखेडा, वाडी व गलवाडा यासाठी एकत्रित पाणी पुरवठा योजनेसाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचा सूचना यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित विभागाला दिल्या. जलशुद्धीकरण केंद्र येथे विद्युत पुरवठा कायम खंडित होत असल्याने शहरात नियमित पाणीपुरवठा होत नाही. शहराला सुरळीत पाणी पुरवठा व्हावा यासाठी जलशुद्धीकरण केंद्राला कायम एक्सप्रेस लाईन देण्यासाठी प्रस्ताव सादर करावा यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून देऊ असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

मुख्यमंत्री सडक योजनेतून सोयगाव तालुक्यातील नवीन रस्त्याच्या कामांचे नियोजन करणे, सिंचन विभागातील विविध प्रस्ताव व सर्वेक्षणाचे काम तातडीने पूर्ण करणे, क्रीडा संकुला साठी वाढीव निधीसाठी प्रस्ताव सादर करणे, लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू करून 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्टे समोर ठेवून उपाययोजना करणे, नुकसानग्रस्त शेतकरी शासनाच्या मदती पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेणे, पीक विमा कंपन्यांनी नुकसानग्रस्तांना नियमाप्रमाणे भरपाई दिला पाहिजे यासाठी कारवाई करणे, कृषी विभाग अंतर्गत पोखरा तसेच मातोश्री ग्राम समृद्धी शेत पानंद रस्त्याच्या कामासाठी प्रस्ताव सादर करून सदरील योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करणे, ग्रामविकास व विविध विभाग अंतर्गत सुरू असलेली विविध विकास कामे निर्धारित वेळेत पूर्ण करणे आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीस शिवसेना शहरप्रमुख संतोष बोडखे, शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख ध्रुपताबाई सोनवणे, युवासेनेचे तालुकाप्रमुख स्वप्नील पाटील, शहर प्रमुख अमोल मापारी, शहर समनवयक अक्षय काळे, एड. योगेश पाटील,दिलीप देसाई, रमेश गावंडे, भगवान वारंगणे, योगेश नागपुरे , कृषी विभागाचे, एस.पी. वाघ, मुख्यमंत्री सडक योजनेचे अभियंता सुनील गुडसुरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री. खेडकर, शाखा अभियंता नितीन राठोड, जि.प. बांधकाम विभागाचे शाखा अभियंता राजेंद्र राजगुरू, वीज वितरण विभागाचे धीरज शिंदे, ए. ए. गौर, भूमिअभिलेख विभागाचे कैलास मिसाळ, अजिंठा एपीआय अमोल मोरे, वनपरिक्षेत्र अधिकारी ए. पी. मिसाळ, निलेश सोनवणे, आर. जी. सपकाळ आदींसह शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी व शहरातील नागरिकांची उपस्थिती होती.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे