महाराष्ट्र
जामठीच्या महाजन विद्यालयात विद्यार्थ्यांवर पुष्पवर्षाव करत स्वागत, पाठ्यपुस्तकांचे वाटप
जामठी (ता.बोदवड) : शासनाच्या निर्देशानुसार आज जामठी येथे श्रीमती चि.स.म.मा.विद्यालयात पहिल्या दिवशी विद्यार्थी शाळा प्रवेशाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. विद्यालयात विद्यार्थ्यांवर पुष्पवर्षाव करुन स्वागत केले.
शाळेत संस्थेचे अध्यक्ष अशोक सत्रे, सचिव भगवान महाजन, मुख्याध्यापक के.आर.पाटील, पर्यवेक्षक एस.टी.कोळी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत करून पहिल्या दिवशी आलेल्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना पोहे व शिरा याचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमात नविन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने स्वागत करून पुस्तक वाटप करण्यात आले.