सिव्हील इंजिनिअरींच्या विद्यार्थीनीची होस्टेलमध्ये आत्महत्या
स्टेशन भागालील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या लेडीज होस्टेलमध्ये मुलींची आत्महत्या करण्याची दुसरी घटना
दोंडाईचा : स्टेशन भागातील वर्दळीच्या राजेश हार्डवेअर व प्लाऊड ह्या इमारतीवरती सुरू असलेल्या महाराष्ट्र शासन आदिवासी विभागाच्या आदिवासी मुलींचे- लेडीज होस्टेलमध्ये आज नवापूर तालुक्यातील रहीवासी असलेल्या व सिव्हील इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाच्या डिप्लोमाला असलेल्या वैशाली तापीदास पावरा (वय-१९) ह्या विद्यार्थीनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ह्या अगोदरही एका विद्यार्थीनीने ह्याच होस्टेलमध्ये आत्महत्या केल्याची घटना घटीत झाल्याने मुलींमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे.
येथील अहिंसा पाॅलीटेक्निकल इन्स्टिट्यूट अन इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाच्या सिव्हील इंजिनिअरिंगच्या डिप्लोमा कोर्सला असलेल्या नवापूर तालुक्यातील पिंपळे गावाची रहिवासी कु.वैशाली तापीदास पावरा (वय-१९) ही आज तीन वाजता लेडीज होस्टेलमधील आपल्या रूमला आल्यावर रूममधील इतर दोन मुली बाजूच्या रूममध्ये बसलेल्या असतांना त्यांना भेटली व साडे तीन वाजता पुन्हा आपल्या रूममध्ये गेली.मात्र ज्यावेळेस रूममधील इतर दोन मुली पुन्हा आपल्या रूममध्ये पाच वाजता आत गेल्या, तेव्हा त्यांना वैशाली लाल ओडनीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली.त्यावेळी त्यांनी तातडीने होस्टेल व्यवस्थापकास माहिती दिली.व्यवस्थापकाने तातडीने दोंडाईचा पोलीसांना माहिती दिली. यावेळी घटनास्थळी पोलीस निरीक्षक श्री दुर्गेश तिवारी, पोलीस नाईक योगेश पाटील,राजेन्द्र सोनवणे यांनी भेट देत पंचनामा केला. तसेच होस्टेलचा रूम सिल करत इतर सोबत असलेल्या मुलींचा जबाब घेतला व मयत वैशाली पावरा हिचे शव पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी- शवविच्छेदन अहवाल प्राप्त करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथे पाठविण्यात आला आहे. याबाबत दोंडाईचा पोलीस स्टेशनला प्रथम माहिती आकस्मित मृत्यु म्हणून घटना दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान सदर घटना जशी वाऱ्यासारखी गावात पोहचली.लोकांनी राजेश हार्डवेअर अँड प्लाऊड ह्या दुकानावर तोबा गर्दी करण्यास सुरूवात केली. कारण ह्या ठिकाणी सुरू असलेल्या महाराष्ट्र शासन आदिवासी विभागाच्या-आदिवासी मुलींच्या लेडीज होस्टेलमध्ये आत्महत्या करण्याची ही दुसरी घटना आहे. ह्या अगोदरही तीन वर्षापुर्वी अशाच एका कमी वय असलेल्या मुलींच्या आत्महत्येने गाव शोकाकुल झाले होते आणि आज परत दुसरी घटना झाल्याने बाहेर गावाहून शिक्षणासाठी आलेल्या मुलींमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे. म्हणून पोलीसांनी घटनेच्या खोलात जाऊन,खरे कारण शोधून मुलींना सुरक्षा पुरवून गावा वाल्यांमध्ये निर्माण होणारे दु:ख कमी व्हायले पाहिजे, अशी सुज्ञ नागरिक पोलीसांकडून अपेक्षा व्यक्त करत आहे.